जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,कोल्हापूर.

NAS INFORMATION

NAS काय आहे?
NAS म्हणजे *National Achievement Survey*
याला *राष्ट्रीय संपादणुक चाचणी/सर्वेक्षण* असेही म्हणतात..
या वर्षीच्या (2017) च्या सर्वेक्षणासाठी आपल्या शाळांची/ वर्गांची निवड केली आहे. *हि निवड NCERT यांनी Random (यादृच्छिक) पद्धतीने केली आहे*
.
दि. 13 नोव्हेंबर 2017 रोजी संपूर्ण देशामध्ये एकाच दिवशी हे सर्वेक्षण होणार आहे.
सर्वेक्षणात इ. 3 री, 5 वी आणि 8 वी या इयत्तांचा समावेश असेल.
वरील तीनही वर्गांसाठी एक चाचणी होणार आहे, चाचणीतील प्रश्न पर्यायी (multiple choice questions) प्रकारातील असतील-
🎯 *चाचणी चे स्वरूप खालील प्रमाणे असेल?*
इयत्ता 3 री, 5 वी:-
भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र या घटकावर आधारित 45 प्रश्न (वेळ 90 मिनिट)

इयत्ता 8 वी:-
भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र, सामाजिक शास्त्र या घटकावर आधारित 60 प्रश्न (वेळ 120 मिनिट)

🎯 *पर्यवेक्षण कोण करणार?*
SCERT/ DIECPD व जि.प. यांच्याकडून आपल्या वर्गासाठी पर्यवेक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आपणांस त्याला फक्त सहकार्य करायचे आहे. वर्गाचे पर्यवेक्षण पर्यवेक्षक करतील तर तालुक्यावर काही खास अधिकारी निरीक्षक म्हणून असतील, त्यांचे एक भरारी पथक असेल. 

🎯 *उत्तरपत्रिका कोण तपासणार?*
प्रत्येक उत्तरपत्रिका OMR पद्धतीने तपासली जाणार आहे. यासाठी राज्यावर स्वतंत्र यंत्रणा असणार आहे. पर्यवेक्षक चाचणी संपल्यावर पर्यवेक्षक सर्व उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका सीलबंद पॅकेट मध्ये घालून पुढील यंत्रनेकडे पाठवतील

🎯 *मुख्याध्यापक/ वर्गशिक्षक म्हणून आपली भूमिका काय?*
-- सीलबंद चाचणी प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका जिल्हा/तालुका स्तरावरून ताब्यात घेणे
-- चाचणीच्या दिवशी (दि. 13 नोव्हेंबर 2017 रोजी) आपल्याला संबधित वर्गाची उपस्थिती 100% ठेवायची आहे.
-- वर्गातील सर्व मुलांचे आधार नंबर एका कागदावर लिहून घेऊन आपल्या दप्तरी ठेवायचे आहेत. ज्यांच्याकडे आधार नसतील त्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आधार काढण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे.
Share:

Popular Posts

Recent Posts

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation test link ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.